पाकिस्तानात बॉम्ब घेऊन जाण्यास तयार : कर्नाटक मंत्र्यांचे विधान चर्चेत
बेंगळूर - पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असतानाच कर्नाटकचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक मंत्री बीझेड जमीर अहमद खान यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. मंत्री बी झेड जमीर अहमद खान यांनी आपण स्वत: सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात युद्धासाठी जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. या विधानामुळे ते चर्चेत आले आहेत.
एका पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री खान यांनी म्हटलं होतं की, "पाकिस्तान नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परवानगी दिली तर आपण युद्धाला जाण्यास तयार आहोत. आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदुस्थानी आहोत. पाकिस्तानचे आपल्याबरोबर कधीही कसलेही संबंध नव्हते. पाकिस्तान आपला कायम शत्रू राहिला आहे. जर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह अन् केंद्र सरकारने परवानगी दिली तर मी युद्धासाठी पाकिस्तानात जाण्यास तयार आहे", असं विधान मंत्री बी झेड जमीर अहमद खान केलं होतं.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या