Type Here to Get Search Results !

मण्णूर गावच्या तरूणाचा खानापूर नदीत बुडून मृत्यू

मण्णूर गावच्या तरूणाचा खानापूर नदीत बुडून मृत्यू 


खानापूर -  येथील मलप्रभा नदीत घाटाजवळ मन्नूर  ता. बेळगाव येथील तरूण बुडाल्याची घटना आज  रविवारी (ता.२६) घडली. समर्थ मल्लाप्पा चौगुले  (२२) असे या तरूणाचे नाव असून तो  कुटुंबीयांसमवेत धार्मिक कार्यासाठी येथे आला होता. नदीपात्रात अंघोळीसाठी गेले असता त्याला पाण्याचा अंदाज आला नसावा परिणामी ही घटना घडली.  

 
कुटुंबीय रेणूका देवीच्या धार्मिक कार्यक्रमात गुंतले असताना समर्थ हा आंघोळीसाठी नदीच्या पात्रात  उतरला होता. घाटाजवळ पाणी अडविण्यात आल्याने पात्रात पाण्याचा साठा अधिक आहे. त्यात त्याला पाण्याचा अंदाज आला नसावा आणि तो बुडाला असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक लालेसाब  गवंडी यांच्यासह अग्नीशामक दलाचे मनोहर राठोड  यांनी धाव घेऊन तात्काळ शोधकार्य हाती घेतले. अद्याप तरूणाचा शोध लागलेला नाही. यावेळी लोकोंनी घाटावर मोठी गर्दी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या