हिंडलगा केंद्रात कुद्रेमानीची सई शिंदे प्रथम
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित कुद्रेमानी हायस्कूलचा दहावीचा निकाल 62.5 टक्के जाहीर झाला. हायस्कूलची विद्यार्थिनी सई शिवाजी शिंदे हिने 592 गुण (94.72 टक्के) मिळवत हायस्कूलबरोबर हिंडलगा परीक्षा केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला. तिने समाज विज्ञान, इंग्रजी विषयात 100 पैकी 100 तर मराठी विषयात 123 गुण मिळविले. ती हायस़्कूलमधील हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. तिने भाषण, सामान्य ज्ञान, काव्यवाचन, निबंध लेखन स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. ती पत्रकार शिवाजी शिंदे यांची कन्या होय.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या