सूपे ( ता.चंदगड ) आरटीओ चेकपोस्ट जवळ भीषण अपघात
भीषण अपघातात बस चालका सह एक प्रवाशी ठार
बेळगाव : बेळगाव वेंगुर्ला या मुख्य रस्त्यावर आज दुपारी ( दि.२२ ) रोजी सुपे येथील आरटीओ चेक पोस्ट जवळ ट्रक आणि चंदगड आगाराची बस यांची समोरासमोर धडक होऊन बस चालक लक्ष्मण पांडुरंग हळदणकर( रा.चंदगड ,वय ४८ वर्ष ) यांचा जागीच मृत्यू झाला. बस कंडक्टर , ट्रक चालक आणि इतर बस मधील २ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंदगड आगाराची बस कोदाली वरून बेळगाव कडे निघाली असता पावसामुळे रस्त्यावर चिखल होऊन समोरून येणाऱ्या रिकाम्या ट्रक ने बसला जोराची टक्कर दिली. धडक इतकी भयानक होती की बस चालकाकडील संपूर्ण बाजू कापली जाऊन बस ड्रायव्हर जागीच ठार झाला. अपघाताची माहिती चंदगड पोलिसांना समजतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून ती पोलिसाकडून सुरळीत करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या