Type Here to Get Search Results !

विश्वासार्हतेतून ‘उत्कर्ष’ सोसायटीचा विकास : युवराज हुलजी

विश्वासार्हतेतून ‘उत्कर्ष’ सोसायटीचा विकास : युवराज हुलजी 

बेळगुंदी उत्कर्ष सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन  



बेळगुंदी : सहकारातून समाजाची समृद्धी साधता येते. यामध्ये संचालक, पदाधिकार्‍यांची भूमिका महत्वाची असते. ग्रामीण भागात उत्कर्ष सोसायटीने अल्पावधीत केवळ प्रगती थक्क करणारी आहे. विश्वासार्हतेतूनच संस्थेचा उत्कर्ष झाला असल्याचे कौतुकोद्गार क्रिडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी व्यक्त केले.

बेळगुंदी उत्कर्ष मल्टीपर्पज सोसायटीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि.7) रोजी आयोजित केला होता. इमारतीचे उद्घाटन युवराज हुलजी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नागेंद्र गवंडी होते. 



जिजामाता सभागृहाचे उद्घाटन अ‍ॅड. सुधीर चव्हाण, काउंटरचे उद्घाटन सीए संदीप खन्नूकर यांच्याहस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन व्हा. चेअरमन नामदेव गुरव, सीए महेश किल्लेकर, कृष्णात पोटुले, भास्कर माने, अशोक निंगाडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विठ्ठल गावडा, राजर्षी शाहू महाराज प्रतिमेचे पूजन ग्रामस्थ कमिटीचे माजी चेअरमन सोमाण्णा गावडा यांनी केले.

प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक व स्वागत संचालक प्रल्हाद चिरमुरकर यांनी केले. 

युवराज हुलजी पुढे म्हणाले, सामान्यांना आधार देत अर्थसहाय्य करण्याचे धोरण उत्कर्ष सोसायटीने ठेवले आहे. काटकसर, पारदर्शकता, आपुलकी, पैशाचा योग विनिमय यातून संस्थेने प्रगती साधली आहे.



अ‍ॅड. सुधीर चव्हाण म्हणाले, कोणतीही संस्था पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, सभासद यांच्यामुळे मोठी होत असते. उत्कर्ष सोसायटीने सामान्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. यामुळे संस्थेचा विकास झाला आहे. सहकार क्षेत्राचा वापर सामान्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केला आहे.

प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले कोगनोळी येथील प्रकाश कदम  म्हणाले, संस्थेने केलेली कामे कौतुकास्पद आहेत. केवळ 12 वर्षात स्वत:ची इमारत उभी करणे अवघड काम असते. परंतु पदाधिकार्‍यांच्या दुरदृष्टीमुळे यश मिळाले आहे. संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. संस्था चालक, कर्मचारी, सभासद, कर्जदार, ठेवीदार यांच्या परस्पर विश्वासातून संस्थेची घोडदौड सुरू आहे. 


यावेळी सीए महेश किल्लेकर, अशोक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. उद्घाटनाच्या निमित्ताने सभासदांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालक प्रसाद बोकडे, भरमाण्णा गावडा, प्रल्हाद शिंदे, राजू किणयेकर, मनोहर कांबळे, परशराम किणयेकर, गुंडू सांगावकर, कोमल पाटील, विजयालक्ष्मी बागिलगेकर, विमल कुन्नुरकर आदीसह जयवंत पाटील, निलम चिरमुरकर आदीसह सभासद, गावकरी उपस्थित होते. 

सूत्रसंचालन सुहास माने, कोपर्डे टीचर यांनी केले. संचालक यल्लाप्पा पाटील यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या