क्रेडाई अध्यक्ष श्री. गोजगेकरानी दोन वर्षाच्या कार्यकाळात उल्लेखनीय कार्य करत वेगळा ठसा उमटवला
बेळगाव : दीपक गोजगेकर यांनी क्रेडाई चे अध्यक्षपद स्वीकारून दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आज रविवार रोजी नवीन अध्यक्ष निवड होणार असून , गेल्या दोन वर्षात क्रेडाई ने केलेल्या कार्याचा आढावा बैठक कार्यक्रम आयोजित केला आहे.
दोन वर्षाच्या कार्यकाळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळत दीपक गोजगेकर यांनी रियल इस्टेट व्यवसाय संबंधित समस्या, व्यवसायातील अडचणी आणि भविष्यातील ह्या क्षेत्रासाठी असलेली आव्हाने स्वीकारून त्या दृष्टीने भरीव कार्य केले आहे. जबाबदारी स्वीकारून वेगवेगळ्या सेमिनार चे आयोजन , लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कार्य आणि अधिकारी वर्गांच्या भेटीगाठी घेऊन व्यवसायातील समस्या मांडून त्याच्यावर उत्तर शोधून मार्गक्रमण करत आले आहेत.
क्रेडाई च्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून बेळगाव येथील रियल इस्टेट व्यवसायाला बळकटी मिळवून दिली आहे. कार्य करताना नैतिकतेची कास सोडली नाही.
अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना क्रेडाई च्या इतर सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज सांभाळत पूर्ण केला. यामध्ये त्यांना क्रेडाईचे सचिव युवराज हुलजी, खजिनदार प्रशांत वांडकर, उपाध्यक्ष गोपाळ कुकडोलकर, सहसचिव आनंद अकणोजी , अमर अकणोजी, सचिन बैलवाड ह्या सदस्यांचे सहकार्य लाभले. तसेच सल्लागार समितीमधून चैतन्य कुलकर्णी, राजेंद्र मुतगेकर , क्वैस नुराणी ह्या लोकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्याचे दीपक गोजगेकर सांगतात.
दीपक गोजगेकर यांच्या कार्यकाळात मैसूर येथे स्टेटकॉन या इव्हेंट मध्ये ५० सदस्यांची उपस्थिती दर्शवून इंजिनियर्स असोसिएशनसह रेरा सत्राचे आयोजन केले, नवीन वीस सदस्य जोडून संघटनेला बळकटी दिली, तसेच सिडनी येथील नॅटकॉन'ला क्रेडाई चे १० सदस्य उपस्थित असल्याचे सांगतात. ई-खाता प्रमाणपत्र मिळवण्यात येणारे अडचणी सोडवण्यासाठी खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधले.
बांधकाम क्षेत्रात वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनाही भेटून त्यावर चर्चा घडवून आणून सुधारणा करून घेण्यात आल्या.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या