बेळगाव - राकस्कोप या मुख्य रस्त्यावरील पाईपलाईन ते केंबाळी नाल्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बिनधास्तपणे कचरा टकला जातो. याठिकाणी ग्राम पंचायतीने ठिक ठिकाणी कचा टाकू नये असा फलकही उभारला आहे. तरी देखील अगदी सुशिक्षित महिला दुचाकीवरून येतात आणि कचऱ्य़ाने भरलेली प्लास्टीकची पिशवीही ऐटीत फेकून देतात.
याबाबत अनेकवेळा बातम्या प्रसिध्द झाल्या असून अनेक लोकांनी ग्राम पंचायतीकडे तक्रारही दिली. ग्राम पंचायतीने घरोघरी जाऊन कचरा उचलण्याची सोयही केली आहे. हिंडलगी ग्राम पंचायतीने घंटागाडी सुरू केली आहे. तरी देखील लोक रस्त्याकडेला कचरा टाकत आहेत. याठिकाणी ओला कचराही टाकल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. याच रस्त्यावरून माॅर्निंग वाॅकलाही लोकांची गर्दी असते.
-----------------------------
ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणाले ;
याठिकाणी कचरा टाकू नये, असा फलक ही लावण्यात आला आहे. तरी देखील लोक याठिकाणी कचरा टाकत आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा आम्ही निर्णय घेणार आहे. याबाबत आज झालेल्या पंचायतीच्या बैठकीतही चर्चा झाली आही. त्याचबरोबर जे लोक कचरा देत आहेत. त्या लोकांकडून कचऱ्याचे वगीर्करण करूण दिले जात नसल्यामुळे कचरा डेपोमध्ये कचरा जमा करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा आवाहन करण्यात येणार आहे.
यल्लाप्पा पाटील
अध्यक्ष, ग्राम पंचायत (बेनकनहळ्ळी)
------------------------------------------------------------------



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या