कंत्राटदाराने केलेली घाण.... ग्राम पंचायतीने काढली
हिंडलगा : कंत्राट दाराने रस्त्याच्या मध्यभागी टाकलेले ठीक ग्रामपंचायतीने बाजूला सारले त्यामुळे वाहत केला होणारा अडथळा दूर झाला. हिंडलगाव ग्रामपंचायत च्या वतीने बेळगाव वेंगुर्ला या मुख्य रस्त्यावरील धोकादायक खडीचे आणि मातीचे ढीग पसरले होते. परिणामी वाहतूकदारांना याचा त्रास सहन करावा लागत होता आज ग्रामपंचायतीने स्वतः लक्ष घालून येथील मातीचे आणि खडीचे ढीग बाजूला सारून मार्ग मोकळा करून दिला त्यामुळे वाहनधारकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वेंगुर्ला रस्त्यावर दुभाजकावर फलक लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राट दिले होते संबंधित कंत्राट दराने दुभाजक फोडून खड्डा काढला मात्र तेथील मातीची उचल करण्याऐवजी रस्त्याच्या मधोमध टाकून दिली होती परिणामी वाहतुकीला सतत अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे लोकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती याबाबत कित्येक वेळा संबंधित कंत्राट गावाकडे मागणी करून देखील त्या मातीच्या ढिगाराची उचल झाली नाही. अखेर आज हिंडलगाव ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी पुढाकार घेऊन या रस्त्यावरील खडीचे व मातीचे ढिगारे टेम्पोमध्ये भरून बाजूला काढण्यात आली त्यामुळे सतत होणारा वाहतुकीचा अडथळा दूर होऊन मार्ग मोकळा झाला त्यामुळे वांधारकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य रामचंद्र कुदळे मेकर सचिव अनिल पाटील यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या