कपिलेश्वर उड्डाण पुलाखाली कचऱ्यांचा ढीग : भांदूर गल्ली रहिवाशी आणि मरगाई योग ग्रुप यांचेकडून दखल
बेळगाव : कपिलेश्वर उड्डान पुलाखाली भांदूर गल्लीच्या कोपऱ्यावर रेल्वे फाटका शेजारी नियमित कचऱ्यांचे ढीग साठायला सुरू झाले आहेत. कचरा टाकण्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध नसल्याने नागरिकांकडून कचरा टाकण्याचे प्रमाण वाढून परिसर दुर्गंधीयुक्त बनत चालला आहे.
सदर दुर्गंधीचा तेथील रहिवाशी नागरिकांना त्रास होत असून तसेच शहराच्या स्वच्छ अभियान उपक्रमाला गालबोट लागत असल्याने , परिसरातील रहिवासी तसेच मरगाई योग ग्रुप यांच्यामार्फत सॅनिटरी इन्स्पेक्टर आनंद व त्यांचे सहकारी तसेच नगरसेविका वैशाली भातकांडे यांचे पती सिद्धार्थ भातकांडे यांना कचऱ्या संदर्भात निवेदन देऊन येतील कचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली.
सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक महादेव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या पाटील , ज्योती नाईक, रुपाली पाटुकले, नंदा गंगणावर , नेहा पाटील, हर्षदा आसुकर, फकिरा चौगुले, नामदेव चौगुले, विनय घाटगे, सुनील चांदेकर, अनंत चौगुले, विठ्ठल मोरे यांनी निवेदन सादर केले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या