बोकनूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ग्रामस्थांकडून आयोजन
बेळगाव : सालाबाद प्रमाणे बोकनूर येथे तिथीनुसार आलेली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच बोकनूर ग्रामस्थामार्फत शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. दीप प्रज्वलन ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील आणि चांगदेव पाटील तसेच इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सरपंच नागेंद्र नावगेकर यांनी पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ वाढवून केले. उपसरपंच मल्लाप्पा पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. उपस्थित महिलांनी पाळणा गीत आणि आरती गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली.
दिवाळी निम्मित घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण विजेत्या स्पर्धकांना या निमित्ताने करण्यात आले.
किल्ला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस शिवसंकल्प सोसायटी कडून रोख २००० रुपये, द्वितीय क्रमांक बक्षीस रोख १५०० रुपये एम. व्ही. के. टूल्स अँड टेक्नॉलॉजीज चे मालक कृष्णा पाटील यांचेकडून , तृतीय क्रमांक बक्षीस रोख १००० रुपये प्रसाद पाटील यांचेकडून जाहीर करण्यात आले होते. तसेच विजेत्या स्पर्धकांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमाला मारुती पाटील, काशीनाथ पाटील, राजू जाधव, यल्लाप्पा पाटील, वासुदेव बीजगर्णीकर, भरमा कांबळे, सचिन पाटील, केदार केसरकर, सौ. व श्री. शीतल उदय सुतार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपसरपंच मल्लाप्पा पाटील यांनी शिवजयंती निमित्त मनोगत व्यक्त केले. चांगदेव पाटील यांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या