समिती शिष्टमंडळाने घेतली सांगली जिल्ह्यातील नेत्यांची भेट
बेळगाव : सीमाप्रश्न सोडवणुकीकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे न्यायालयीन दाव्याला गती मिळत नाही. तसेच सीमाभागात मराठी भाषिकांवर कर्नाटकाकडून सातत्याने अन्याय करण्यात येतो. याबाबत महाराष्ट्राने आवाज उठवावा, यासाठी समितीच्यावतीने मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्यात येणार असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सांगली येथे खासदार विशाल पाटील तसेच माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
संसदेत यावर आवाज उठून असे आश्वासन
खासदार विशाल पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले
तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्वतः मोर्चात
सहभागी होणार असल्याचे सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या