अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बेळगाव : राज्यातील 9 विद्यापीठे बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आजच्या या मोर्चात शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी -विद्यार्थिनी हातात निषेधाचे फलक आणि अभावीपचे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या विद्यार्थ्यांनी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले. याप्रसंगी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी मानवी साखळी करून कांही काळ रास्तारोको करण्याद्वारे आपला निषेध व्यक्त केला. यावेळी भारत माता की जय या घोषणेसह सरकारचा धिक्कार करणाऱ्याजोरदार घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी चौक दणाणून सोडला होता.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या