नंदगडात सिलेंडरचा स्फोट ; पाच जण गंभीर जखमी
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड गावात स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या घटनेत एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नंदगड गावातील जनता कॉलनीतील रघुनाथ मादार यांच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन रघुनाथ मदार (वय 35), नागराज कोलकार (वय 30) मशान मशानव्वा कोलकार (वय 55) मनिषा कांबळे (वय 26), प्रकृती कांबळे, आराध्या कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
गेल्या आठवड्याभरापासून श्री महालक्ष्मी देवीचा यात्रा उत्सव सुरू आहे. ही सिलेंडर स्फोटाची घटना घडली आहे परिणामी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या