बेळगाव : तालुक्यातील बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवत मातीपासून कल्पक वस्तू घडविल्या. तर चिखल मळण्याचाही आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
शाळेत आयोजित मातीपासून वस्तू बनविण्याच्या या आगळ्यावेगळ्या स्तुत्य उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मातीपासून विविध वस्तू तयार केल्या.
बालचमूने या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत मातीपासून कल्पकतेने बैल, बैलगाडी, खेळण्याच्या वस्तू, स्वयंपाकाच्या वस्तू अशा वस्तू तयार केल्या. यावेळी शाळेच्या शिक्षिका तेजस्विनी भडांगे, सुषमा सुतार, पूजा पाटील, शैला कोळी यांनी परिश्रम घेतले.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या