विज्ञान केंद्राच्या प्रकल्पाचे भूमिपूजन
बेळगाव : आकाशगंगेत ग्रह-ताऱ्यांविषयी असलेले कुतूहल, समज-गैरसमज, नानाविध काेडी उलगडून दाखविण्यासाठी बेळगाव जिल्हातील हिडकल नदी काटावर तारांगण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती मंत्री एन.एस. भोसराजू यांनी दिली. आज केंद्राच्या प्रकल्प उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड वाढवण्यासाठी विज्ञान केंद्रांची स्थापना केली जात असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा पालकमंत्रीपद सतीश जारकिहोळी यासह इतर लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या