समाजकार्यामुळे सद्भाभावनेचे वातावरण टिकून: राजेश पाटणेकर
बेळगाव - बेळगाव शहरात अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने कार्य करत आहेत सामाजिक संस्थांच्या कार्यामुळेच शहरातील सद्भभावना टिकून असल्याचे प्रतिपादन गोव्याचे माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी बोलताना केले
जाएन्ट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा काल रविवारी वेंगुर्ला रोड येथील मधुरा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासह जाएंट्स सेंट्रल कमिटीचे सदस्य दिनकर अमीन,स्पेशल कमिटी सदस्य गजानन निलकारी तसेच जाएंट्स फेडरेशन 6 अध्यक्ष तेजस्वर राव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉक्टर एस एन पाटील वक्ते म्हणून उपस्थित होते.
यावेळी दिनकर अमिन यांनी,जाएंट्स मेन नूतन अध्यक्ष यल्लाप्पा पाटील याचबरोबर उपाध्यक्ष अरुण काळे व लक्ष्मण शिंदे,डायरेक्टर ऑफ फायनान्स मधु बेळगावकर, संचालक वर्गात अरविंद देशपांडे,विनोद आंबेवाडीकर, भास्कर कदम, राहुल बेलवलकर, अजित कोकणे, गोविंद टक्केकर,आनंद कुलकर्णी,दिगंबर किल्लेकर, प्रकाश तांजी,सुनील चौगुले,शरद पाटील, प्रदीप चव्हाण यांना अधिकाराची शपथ दिली. तेजस्वर राव यांनी जाएंस नूतन सदस्यांना शपथ दिली. राजेश पाटणेकर यांच्यासह अन्य प्रमुख अतिथींनी जाएंट्सने चालविलेल्या कार्याची प्रशंसा व्यक्त करताना नव्या कार्य करणे ला भावी कार्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जाएंट्स संस्थापक नाना चुडासामा व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. फेडरेशन संचालक संजय पाटील यांनी उपस्थित आमचे स्वागत केले.मुकुंद महागावकर यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालना बरोबरच जाएन्ट्स कार्याची माहिती दिली. पुढील काळात जाएंट्स मेन च्या वतीने देहदान, नेत्रदान, त्याचबरोबर अवयव दान यासारख्या उपक्रमांबरोबरच गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत तसेच अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही नूतन अध्यक्ष यलाप्पा पाटील यांनी सांगितले. पदग्रहण सोहळ्याला जेन्ट्स सदस्यांसह शहर आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या