Type Here to Get Search Results !

युवा समितीकडून नेताजी सुभाष चंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

 युवा समितीकडून नेताजी सुभाष चंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी 

बेळगाव : आज २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तर उपाध्यक्ष वासु सामजी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी बोलताना सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याचा आढावा घेतला स्वातंत्र्यपूर्वकाळात युवकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रप्रथम हा नारा सुभाष चंद्र बोस यांनी दिला, रक्त सांडल्याशिवाय क्रांती घडणार नाही यासाठी सैन्याची गरज असून भारतीय नागरिकांनी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी केले होते. "तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा" म्हणत आझाद हिंद सेनेची स्थापना त्यांनी केली आणि स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली. स्थापनेपासूनच शिवसेनेने सीमालढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला,  महाजन अहवाल फेटाळावा आणि सीमाप्रश्न तातडीने सोडवण्यासाठी ६७ हुतात्मे शिवसेनेने दिले. आयुष्याच्या अखेरीपर्यंत बाळासाहेब ठाकरे सीमाप्रश्न सुटावा यासाठी आग्रही होते. अशा थोर नेत्याना युवा समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

 यावेळी उपाध्यक्ष गुंडू  कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, अश्वजीत चौधरी, सौरभ जोशी, महेश चौगुले, विकास भेकणे, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या