Type Here to Get Search Results !

बेळगुंदी श्री रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात ; कळसावरील आठ मुर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन

बेळगुंदी श्री रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात ; कळसावरील आठ मुर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन

बेळगुंदी :  ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराच्या कळसाचे काम अंतिम टप्प्यात आले असून कळसावरील आठ मुर्त्यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कामासाठी मान्यवरानी  १  लाख ८७ हजार रुपयाची रोख देणगी दिली.

श्री रवळनाथ मंदिराच्या जीर्णोदराचे काम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थ कमिटीने कंबर कसली असून येत्या दोन महिन्यात मंदिराचे काम पूर्ण करण्याकडे वाटचाल चालू आहे कळसाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे या कळसांमध्ये आठ मुर्त्या बसवलेल्या आहेत त्या मुर्त्यांचे पूजन महादेव कृष्णा पाऊसकर, शिवलिंग शंकर सावळगी, मारुती रामा बेटगेरीकर , भाऊराव काकतीकर, गावडू रामू पाटील, गणपती दत्तू बेळगावकर, लक्ष्मण हुवप्पा  मुगुटकर, राहुल कल्लाप्पा सुतार, कल्लाप्पा अर्जुन गावडा, विनायक कृष्णाजी कोरडे, पैलवान मारुती जिवणू शिंदे, रामा भाऊराव सुतार, लक्ष्मण महादेव पाटील, भरत साईनाकर, उमेश कुबल मंगेश भरमानी मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 

कळसाच्या कामासाठी १ लाख ८७ हजार रुपये देणगी जमा

 ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष दयानंद गावडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्व देणगीदारांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून ग्रामस्थ कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी ग्रामस्थ कमिटीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ग्रामस्थ कमिटी सदस्य किरण मोटणकर  यांनी केले तर ग्रामस्थ कमिटीचे सदस्य रामचंद्र पाटील यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या