मंगाईनगर, वडगाव येथे कै. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
बेळगाव :मंगाईनगर, वडगाव येथील शिवसेना (उबाठा) श्री मंगाईनगर रहिवासी संघ व महिला मंडळ यांच्यावतीने हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.
सोमेश्वरी हॉल, वडगाव येथे आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बंडु केरवाडकर आणि मंगेश पोटे यांच्या हस्ते दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
तत्पूर्वी बंडू केरवाडकर यांनी बाळासाहेबांबद्दल माहिती देताना त्यांना सीमाभागातील मराठी जनतेबद्दल किती आदर होता ते सांगितले. यावेळी श्रीधर बिर्जे, आनंद गोंधळी, भालचंद्र उचगावकर, किशोर तळेकर, सहदेव रेमानाचे, सागर पाटील, महेश हसबे, प्रशांत हानगुजी, राम सांबरेकर, शुभम पवार, सदरे अण्णा, बाळू भोसले, रमण राव, रमेश कडोलकर, मंजू कडोलकर आदींसह श्री मंगाईनगर रहिवासी संघ व महिला मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या