Type Here to Get Search Results !

आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना

आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना

अथणी : बेळगाव जिल्ह्यात बाळंतिणींच्या मृत्यूची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना अथणी येथील रुग्णालयात घडली आहे, येथील मुतव्वा संतोष गोळसंगी (21) या बाळंतिण महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुतव्वा हिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मुतव्वाला ३१ जानेवारी ही प्रसूतीची तारीख देण्यात आली होती. मात्र प्रकृती खालावल्याने तिला अथणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब वाढल्याने प्रसूतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने बाळंतिणीची प्रकृती चिंताजनक बनली होती. डॉक्टरांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना वाटेतच मुतव्वाचा मृत्यू झाला. डॉक्टरांचा बेजबाबदारपणाच बाळंतिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालक आणि कुटुंबीयांनी केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या