Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय ग्रंथालयाला पुस्तकांची भेट

 स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय ग्रंथालयाला पुस्तकांची भेट

बेळगाव : स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघातर्फे सुभाषचंद्र बोस जयंती सैनिक भवनमध्ये साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाला संघातर्फे ग्रंथालयाला पुस्तकांची भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कलघटगी हे होते. 

सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघातर्फे कॉलेजच्या प्राचार्या आणि शिक्षकवृंदसोबत विद्यार्थ्यांच्याकडे ग्रंथालयासाठी पुस्तके सुपूर्द करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य सैनिक संघाचे खजिनदार विवेकानंद पोटे,, संचालक किरण बेकवाड, एस. के. पाटील, बसवराज हट्टीगौडर, सौ. भारती वाटवे,  तसेच कॉलेजच्या प्राचार्या एम एच पवार, स्मिता मुतगेकर, मयूर नागेनहट्टी, के एल अष्टेकर, आणि कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या