वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या ब्युटी पार्लर आणि स्पावर पोलिसांचा छापा
बेळगाव : अनगोळ परिसरात आज सकाळी एका ब्युटी पार्लर आणि स्पावर पोलिसांनी छापा टाकला. अनगोळ परिसरात असलेल्या अंजली स्पा आणि ब्युटी पार्लरवर पोलिसांनी आज सकाळी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले, पोलिसांनी स्पामध्ये असलेल्या 6 महिलांची सुटका केली. स्पा आणि ब्युटी पार्लरच्या मालक अंजली संजय हिला पोलिसांनी अटक केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या