Type Here to Get Search Results !

येळळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 येळळूर येथील नेताजी मल्टीपर्पज  सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

येळळूर : येळळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचा 25 वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डी जी पाटील होते. सोसायटीचे अध्यक्ष डी जी पाटील व उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे यांनी श्रीफळ वाढवून पूजन केले.

 


यावेळी अध्यक्ष डी. जी. पाटील  म्हणाले, सोसायटीची स्थापना 2001 साली झाली. त्याला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेचे संचालक,  सभासद, हितचिंतक ठेवीदार व कर्मचाऱ्यांच्या  प्रामाणिकपणामुळे व झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे  संस्थेने अल्पावधीतच  गरुड झेप घेत, येळळूर व परिसरात आपला नावलौकिक मिळविला आहे. वडगाव व बापट गल्ली येथे शाखा स्थापन केल्या  आहेत.येळळूर व वडगाव येथे संस्थेने स्वतःच्या इमारती उभ्या केल्या आहेत. त्याचबरोबर नेताजी युवा संघटनेच्या वतीने परमेश्वर नगर येळळूर येथे नेताजी मराठी सांस्कृतिक भवनाची उभारणी करण्यात आली आहे. याचबरोबर गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवत बांधिलकी जपली आहे. यावेळी संचालक संजय मजुकर, प्रा. सी.एम गोरल, किरण गिंडे, सी.एम. उघाडे, सल्लागार परशराम गिंडे, के. एन. पाटील,अनिल पाटील, शंकर मुरकुटे, प्रभाकर कणबरकर,  वसंत मुचंडी, अनिल मुरकुटे, गणपती हट्टीकर, भोमाणी छत्र्यान्नावर, सचिव   दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, रवी कणबरकर, विजय धामणेकर,  कांचन पाटील, ज्योती यरमाळकर, वैष्णवी मुरकुटे, संगीता दणकारे, सोनाली सायनेकर, लता गिंडे  आदी उपस्थित होते. प्रस्ताविक संजय मजुकर यांनी केले. आभार प्रा. सी.एम. गोरल यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या