Type Here to Get Search Results !

आमदार सेठ करणार मराठी शाळांतील पट संख्या वाढीसाठी प्रयत्न ः पत्रकार परिषदेत दिली माहिती


आमदार सेठ करणार मराठी शाळांतील पट संख्या वाढीसाठी प्रयत्न ः पत्रकार परिषदेत दिली माहिती

बेळगाव, ता. 11 ः शहरातील मराठी शाळांतील पटसंख्या कमी होत असून या  शाळांची पट संख्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही इतर माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक चांगली असते. मतदारसंघातील मराठी बरोबर इतर भाषेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्याबरोबर सध्या व्यनाच्या विळख्यात सापडत चालेल्या तरूणाईला एक योग्य दिशा देण्याबरोबर त्यांना काम देण्याचे कार्य आमदार असिफ (राजू) सेठ फाउंडेशन च्या माध्यमातून केले जाणार आहे. अशी माहिती. आमदार राजू सेठ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 



यावेळी आमदार म्हणाले,  समाजाच्या शिक्षण, आरोग्य आणि करिअर अशा वेगवेगळ्या पातळीवर काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.   फाउंडेशनच्या माध्यमातून  येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघातील गरीब होतकरू आणि परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी विविध कामे करण्याचे रूपरेषा तयार केली गेली आहे. गरिबीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. अशा गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हुशार विद्यार्थ्यांना करिअर साठी मार्गदर्शन करणे  विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य अशी लायब्ररी उभा करून सर्व प्रकारचे सहकार्य आणि सोयी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. 

तसेच बेळगाव मधील बरीच तरुणाई सध्या ड्रग्ज च्या व्यसनामध्ये गुंतत चालली असून व्यसनी पडलेल्या तरुणांना त्यातून बाहेर पडणं सहज शक्य होत नाही . शिवाय गरीब तरुणांना नशा मुक्ती केंद्रातील खर्च ही परवडत नाही. ज्या गरीब तरुणांना खर्च परवडत नाही त्यांना सोयी दिल्या जातील, तसेच नाममात्र शुल्क घेऊन इतर तरुणांनाही योग्य उपचार करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
तसेच सर्व सोयीने युक्त असे अत्याधुनिक नशा मुक्ती केंद्र उपलब्ध नसल्याने  तरुणांचे  आयुष्य उध्वस्त होत  असून अशा तरुणाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फाउंडेशन काम करणार आहे.नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना रिहॅबिटेशन सेंटरमध्ये नशा मुक्ती संदर्भातील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांचे  औषधपाणी,  आणि तज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन च्या माध्यमातून तरुणाईच जीवन वाचवण्याचा फाउंडेशनच्या माध्यमातून काम होणार आहे. अशे आमदार आसिफ( राजू) शेठ असे सांगितले. यावेळी अमन शेठ म्हणाले  चालू साली मॅरेथॉन आयोजित करून हेल्थ संदर्भात जनजागृती  करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या