सांबरा यात्रेच्या रथ बांधणीला प्रारंभ
बेळगाव, ता. १३ : सांबरा येथील श्री महालक्ष्मी यात्रेसाठी रथ बांधणीच्या कामाचा आज दुर्गादेवी मंदिर आवारात शुभारंभ करण्यात आला. तब्बल १८ वर्षानंतर सांबरा गावची श्री महालक्ष्मी यात्रा होणार आहे. यात्रेसाठी ७० फूट उंचीचा लाकडी रथ बनविण्यात येणार आहे.
यात्रा कमिटी, देवस्थान कमिटी, हकदार, कारागीर आणि ग्रामस्थ्यांच्या उपस्थितीत पूजन करून रथ उभारण्याच्या कार्याला सुरुवात करण्यात आली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी धार्मिक विधीची माहिती दिली. आगामी दोन महिन्यात रथ बांधणीचे काम पूर्ण करणार असल्याची माहिती कारागीर बांधवानी दिली. १४ मे २०२४ रोजी यात्रेला सुरुवात होणार आहे. पहिले चार दिवस रथोत्सवासह नऊ दिवस यात्रा चालणार असून २२ मे रोजी यात्रेची सांगता होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या