Type Here to Get Search Results !

कन्नडसक्ती विषयी समितीच्या युवा नेत्यांनी घेतली आमदार अमोल मिटकरी यांची भेट

 कन्नडसक्ती विषयी समितीच्या युवा नेत्यांनी घेतली आमदार अमोल मिटकरी यांची भेट



मुंबई, ता. १३ : बेळगावसह संपूर्ण सीमाभागात कर्नाटक सरकारकडून कानडी अत्याचार, कन्नडसक्ती केली जात आहे. त्याचबरोबर दुकानावरील मराठी फलक तोडफोड करण्याचे काही कन्नड संघटनाच्या गुंडांनी आरंभिले आहे. याबाबत कर्नाटक सरकारकडून संबंधित गुंडांचा बंदोबस्त  करण्याकडे कानाडोळा करत आहे. याचबरोबर महाराष्ट्र सरकारकडून ही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी याबायत आपण सरकारकडे मागणी लावून धरावी. या मागणीचे निवेदन आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे समितीच्या युवा नेत्यांनी केली.

निवेदनात म्हंटले आहे की, समन्वय मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील व श्री शंभूराज देसाई हे निष्क्रिय ठरत आहेत. केंद्र सरकारने जी कमिटी त्रिसूत्री ठरवली आहे त्याप्रमाणे सीमाभागातील मराठी माणसासाठी (हेल्पलाइन) मदत केंद्र याची वेबसाईट तयार करावी जेणेकरून रोज होणाऱ्या समस्या या. त्या वेबसाईट वर प्रदर्शित केल्या जातील जेणेकरून केंद्र आणि महाराष्ट्रात सरकारचे लक्ष त्यावरती जाईल आणि त्या ठिकाणी मराठी माणसाला न्याय मिळेल.

   त्याचबरोबर आपण मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माननीय. मोदीजी व अमित शहा यांची भेट घेऊन काश्मीर प्रमाणे आमचा प्रश्न सोडवावा.  त्याचबरोबर बेळगावचा एक आपण दौरा करावा आणि प्रत्यक्षात तिथल्या समस्या आपण जाणून घ्यावाही आपल्यासमोर विनंती. असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी समितीचे युवा नेते सुरज कणबरकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या