श्रीधन सुरेश मुळीक यांची निवड
बेळगाव, ता. १३ : श्रीधन सुरेश मुळीक यांची जायंटस वेल फेअर फाउंडेशन उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
शास्त्री नगर येथील प्रतिष्ठित नागरिक असून जाईंटस परिवार बेळगांव या ग्रुपचे अध्यक्ष म्हणून २०१८ ते २०२२ या काळात त्यांची केलेली कामगीरी पाहून त्यांना युनिट-6 च्या संचालक पदावर निवड करण्यात आली.
त्यांच्या कार्याची दखल घेत जायंट्सने यापूर्वी त्यांना एकूण १६ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्या मध्ये बेस्ट आऊटस्टँडिंग ग्रुप अध्यक्ष आणि बेस्ट आऊटस्टँडिंग युनिट डायरेक्ट असे ऐकून 16 अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. याची दखल घेत या वर्षी कर्नाटक फेडरेशन उपाध्यक्ष पदी त्यांची निवड झाली
ते एक चांगले व प्रतिष्ठित अभियंते असून श्री सिद्धिविनायक कंट्रक्शन चे संचालक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी नगर सेवक सुरेश मुळीक यांचे सुपुत्र आहेत.
-----------------


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या