नूतन बार असोसिएनचे उपाध्यक्षानी दिली युवा समितीच्या कार्यालयाला भेट
बेळगाव, ता. १३ : बार असोसिएशनचे नवनियुक्त उपाध्यक्ष ऍड शीतल रामशेट्टी यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ऍड. सुभाष कृष्णाचे, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, सूरज कुडूचकर , विनायक कावळे,आकाश भेकणे, आनंद पाटील, आशिष कोचेरी, प्रतिक पाटील, आश्र्वजित चौधरी आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या