Type Here to Get Search Results !

जायंट्स फेडरेशनवर लाड,पाटील,हिरेमठ यांची निवड

जायंट्स फेडरेशनवर लाड,पाटील,हिरेमठ यांची  निवड 


बेळगाव, ता, १० : राज्यातंर्गत कार्यरत असलेल्या   जायंट्स फेडरेशन 6 वर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे माजी अध्यक्ष अनंत लाड, शिवराज पाटील व शिवकुमार हिरेमठ यांची निवड करण्यात आली आहे. 



 यापूर्वी युनिट डायरेक्टरपद भुषविलेले अनंत लाड यांना पुन्हा युनिट १ च्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली  आहे. यापूर्वी तीन वेळा फेडरेशन डायरेक्टर म्हणून काम केलेल्या शिवराज पाटील यांना  पुन्हा फेडरेशन डायरेक्टरपदी नेमण्यात आले. त्यांना मेंबरशिप ग्रोथची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवकुमार हिरेमठ यांची  पहिल्यांदाच फेडरेशन डायरेक्टर पदासाठी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी देण्यात आली आहे .

 अनंत लाड व शिवराज पाटील हे पायोनियर अर्बन बॅंकेचे संचालक असून बेळगावातील अनेक सामाजिक संस्थाशी त्यांचा जवळचा संबंध आहे. शिवकुमार हिरेमठ हे क्लास 1 सरकारी कंत्राटदार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या