बेळगुंदीत उद्या साहित्याचा होणार जागर
महाराष्ट्रातील साहित्यिक राहणार उपस्थित
बेळगाव, ता. ८ : बेळगुंदी (ता. बेळगाव) येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने १८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन उद्या (ता. ११) सकाळी ७.३० ते सायंकाळी ७ वा. पर्यंत करण्यात आले आहे. मरगाई देवस्थान परिसरात होत असलेल्या या या स्मेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मराठी विभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे उपस्थित असणार आहेत.
ग्रंथ दिंडीचे उद्घघाटन व अध्यक्ष भाषण सकाळी ८ ते १२ या वेळेत होणार आहे. दुसरे सत्र दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत होणार आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सांगली येथील ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन हे असतील. या सत्रात सांगली 'सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी, ज्येष्ठ पत्रकार मंगेश मंत्री व वाळवा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार हे 'विद्यार्थी पालक व समाज' या विषयावर मत मांडणार आहेत. तिसऱ्या सत्रांत दुपारी ३ ते ४.३० पर्यंत 'कवितेचा इंद्रधनू' हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्लामपूर येथील कवी भूषण आनंदहरी असतील.
यामध्ये निमशिरगांव येथील विजयकुमार बेळंके यांचा सहभाग असेल. चौथे सत्र दुपारी ४.३० ते ६ वाजेपर्यंत होणार आहे. या सत्रात बुरुंगवाडी येथील विजय जाधव हे कथादूत ही कथा सादर करणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या