येळ्ळूरात उद्या मराठीचा जागर ; चार सत्रात आयोजन, पुरस्काराचेही वितरण
येळ्ळूर, ता. १० : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने उद्या रविवार दि. 11 रोजी सीमासत्याग्रही, स्वातंत्र्य सैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलन नगरीत, श्री शिवाजी विद्यालय येळळूर च्या पटांगणात, 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनात संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक व सामाजिक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष श्रीराम पवार (कोल्हापूर) आपले अध्यक्षीय भाषण करणार असून दुसऱ्या सत्रात समाजसेविका व रमाबाई आंबेडकर पुरस्कार विजेत्या ज्योती पठाणिया (पुणे) आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तसेच या सत्रात वसंत हंकारे (सातारा) यांचा पुन्हा जगुया आनंदाने हा कार्यक्रम होणार आहे. तिसऱ्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
चौथ्या सत्रात सातारा येथील तानाजी कुंभार व सहकाऱ्यांचे विनोदातून समाज प्रबोधन करणारे भारुड सादर करणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन टिळकवाडी येथील हॉटेल उदय भवन चे मालक सूर्यकांत केशव शानभाग यांच्या हस्ते होणार आहे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून येळळूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक पाटील हे असणार आहेत. रविवारी सकाळी 8:30 वाजता ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरापासून ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार आहे. संमेलन नगरीचे उद्घाटन माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते होणार आहे, तर दिवंगत सीमा सत्याग्रही केदारी नागोजी गोरल प्रवेशद्वाराचे उद्घाटन बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर कृष्णा बिजगरकर यांच्या हस्ते होणार आहे, दिवंगत राजा शिरगुपे ग्रंथ दालनाचे उद्घाटन उद्योजक श्रवणकुमार हेगडे यांच्या हस्ते होणार आहे, स्वामी विवेकानंद सोसायटी सभामंडपाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील यांच्या हस्ते होणार आहे, स्वामी विवेकानंद विचार पिठाचे उद्घाटन ॲड. सागर खन्नूकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाला उपस्थित साहित्य रसिकांना प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रा. यल्लोजीराव निंगोजीराव मेणसे (येळळूर) यांच्याकडून, नेताजी मराठी सांस्कृतिक भवन येळळूर या ठिकाणी अल्पोपहार देण्यात येणार आहे.
*संमेलन दृष्टीक्षेपात*:
* ग्रंथ दिंडी - सकाळी 8:30 वाजता
* पहिले सत्र -उद्घाटन सकाळी 10:30
* अध्यक्ष भाषण : सकाळी 10:45
* दुसरे सत्र : दुपारी 1, ज्योती पठाणीया यांचे मनोगत
* पुन्हा जगूया आनंदाने, यावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान दुपारी 1:30
* तिसरे सत्र : शैक्षणिक पुरस्काराचे वितरण, दुपारी 3 वाजता
* चौथे सत्र : भारुड कार्यक्रम- विनोदातून समाज प्रबोधन : तानाजी कुंभार व सहकारी, दुपारी 3:30 वाजता.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या