शिवसेनेतर्फे हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव, ता. ८ : शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे सीमा लढ्यातील शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले आहे.
रामलिंग खिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौक येथे आज सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सम्राट अशोक चौकातील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले. यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रकाश शिरोळकर यांच्यासह अन्य काहींची समयोचित भाषणे झाली. तालुका प्रमुख सचिन गोरले,दिलीप बैलूरकर, राजकुमार बोकडे , दत्ता पाटील, पिराजी शिंदे, शुभम शेळके, अंकुश केसरकर,धनंजय पाटील, अमर यळ्ळुरकर आदींसह बरेच शिवसैनिक सदर कार्यक्रमास उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या