Type Here to Get Search Results !

मोटर दुरुस्त करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू

 मोटर दुरुस्त करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू 


बेळगाव, ता. ७ : घरचा स्लॅब घालताना बंद पडलेली मोटर दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा हणमण्णावर (वय ४७) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना (ता. ७) बसवण कुडची येथे घडली. 

कल्लाप्पा हणमण्णावर हे १९९८ पासून हेस्कॉमच्या बेळगाव शहर उपविभाग विभागीय कार्यालय ३ सबरीजन १ येथे मीटर रीडर म्हणून सेवा बजावत होते. आज आपल्या मित्राच्या घरच्या स्लॅब घालताना बंद पडलेली मोटर दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा हणमण्णावर यांना विजेचा धक्का बसल्याने ते विहिरीत पडले. विजेचा धक्का लागून विहिरीत पडल्यानंतर पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या