Type Here to Get Search Results !

वेदांत एक्सलन्स अ‍ॅवार्डचे शनिवारी वितरण सोहळा अ‍ॅवार्डचे शनिवारी वितरण : महिला विद्यालयात कार्यक्रम

वेदांत एक्सलन्स अ‍ॅवार्डचे  शनिवारी वितरण सोहळा 

बेळगाव, ता.१५ : येथील वेदांत फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार्‍या वेदांत एक्सलन्स अ‍ॅवार्डचे वितरण शनिवार दि. 17 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. महिला विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी राहणार आहेत.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन समृद्धी संस्थेचे सेक्रेटरी वीरेश किवडसण्णावर, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळ्ळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मार्कडेय साखर कारखान्याचे संचालक अविनाश पोतदार मार्गदर्शन करणार आहेत.

   

प्रमुख पाहुणे म्हणून रमेश आनंदाचे, बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, शिक्षक संघटनेचे शहर अध्यक्ष बाबू सोगलण्णावर, आय. डी. हिरेमठ, प्राचार्या कविता परमानीक आदी उपस्थित राहणार आहेत.

 

या कार्यक्रमात शिक्षक सी. वाय. पाटील (ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी), बेबीअस्मा नाईक (सरकारी प्राथमिक शाळा शाहूनगर), अनुराधा तारिहाळकर (सरकारी प्राथमिक शाळा बसुर्ते), सुजाता लोखंडे (सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 24), पत्रकार राजशेखर पाटील (इन न्यूज वाहिनी बेळगाव), शिवाजी शिंदे, (दै. पुढारी, बेळगाव), सुनिल पाटील (द न्यू इंडियन एक्सप्रेस) तसेच पोलिस केंपाण्णा दोडमनी ( एपीएमसी पोलिस स्थानक), कशिनाथ इरगार (उत्तर विभाग रहदारी पोलिस स्थानक) या नवरत्नांना वेदांत फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. सन्मानपत्र, शाल, हार व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. फांउडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष एन. डी. मादार, सचिव ईश्वर पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या