Type Here to Get Search Results !

महापौर पदी सविता कांबळे, उपमहापौर पदी आनंद चव्हाण विजयी

महापौर पदी सविता कांबळे, उपमहापौर पदी आनंद चव्हाण विजयी 

बेळगाव, ता. १५ : महानगरपालिकेच्या महापौरपदी सविता कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आनंद चव्हाण विजयी झाले. विजयानंतर भाजपकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.



यावेळी महापौरपद अनुसुचित जाती महिलेसाठी आरक्षित होते. भाजपकडून महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेविका सविता कांबळे आणि प्रभाग क्रमांक 35 मधील नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनी अर्ज दाखल केला होता. अखेरीस नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे नगरसेविका सविता कांबळे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

उपमहापौरपद सर्वसामान्य वर्गासाठी होते उपमहापौरपदासाठी भाजपाकडून प्रभाग क्रमांक 45 मधील नगरसेवक आनंद चव्हाण आणि प्रभाग क्रमांक 54 मधील नगरसेविका माधवी राघोचे या दोघांनी अर्ज दाखल केला होता. तर प्रभाग क्रमांक 45 च्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांनीही विरोधात अर्ज दाखल केला होता.


अखेरीस माधवी राघोचे यांनी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे आनंद चव्हाण आणि ज्योती कडोलकर हे दोघेच रिंगणात राहिले. या निवडणुकीत भाजपच्या आनंद चव्हाण यांना सर्वाधिक 39 मते मिळाली आणि ते उपमहापौर पदी निवडून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या