Type Here to Get Search Results !

महा आरोग्य शिबिरात 3 हजार जणांची तपासणी महिलांची उत्स्फूर्त प्रतिसाद, मोफत औषधांचे वितरण

 महा आरोग्य शिबिरात 3 हजार जणांची तपासणी 

महिलांची उत्स्फूर्त प्रतिसाद, मोफत औषधांचे वितरण 


बेळगाव, ता. ७ : महांतेश कवटगीमठ फाऊंडेशच्या मोफत महा आरोग्य शिबिरात तीन हजारहून अधिक नागरिकांची आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. शिबिराला बेळगुंदी भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महिलांची गर्दी अधिक दिसून आली. शिबिराचे आयोजन केल्याबद्दल लोकांतून समाधान व आभार व्यक्त करण्यात आले. 


बेळगुंदी बालवीर विद्यानिकेतन शाळेत आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनजय जाधव होते. यावेळी व्यासपिठावर माजी विधानपरिषद आमदार महातेंश कवटगीमठ,  बेळगुंदी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष प्रताप सुतार, निवृत्त मुख्याद्यापक शकंर चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, बालविर सोसायटीचे अध्यक्ष आनंदा जाधव, माजी नगरसेवक दीपक वाघेला आदी उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगुंदी विभागाच्या वतीने महातेंश कवटगीमठ यांच्या पुष्पहार घातून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांचाही आभार मानण्यात आले.  



शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना महांतेश कवटगीमठ म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्याबरोबर त्यांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठीच फाऊंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्यांदाच बेळगुंदी भागात महा आरोग्य शिबिराचे आयोजन करून या भागातील शेतकरी कुटुंबातील नागरिकांच्या आणि महिलांच्या आरोग्याच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लोकांनीही या शिबिराचा फायदा करून घ्यावा. सुमारे अडिच हजार हून अधिक लोकांनी नोंदणी केली. नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या तक्रारी संबंधित डाॅक्टरांच्या समोर मांडून त्या आरोग्य समस्यांव उपचार करून घ्यावे. असे आवाहन श्री. कवटगीमठ यांनी केले. यावेळी धनजय जाधव, माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष यल्लाप्पा ढेकोळकर यांनीविचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष हादगल यांनी केले. शिबिरात बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बिजगर्णी, कावळेवाडी, बेळवट्टी, बडस, बाकनूर आदी गावातील नागरिकांनी या महा आरोग्य शिबिरात तपासणी करून घेतली. तीन हजारहून अधिक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. तपासणीसाठी आलेल्या लोकांना गावातून वाहतुक सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले. 

 . 
----------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या