चन्नम्मा चौकात ऊसवाहू ट्रॅक्टरची चार वाहनांना धडक
बेळगाव, ता. १२ : ऊस वाहू ट्रॅक्टरने एकाच वेळी चार वाहनांना धडक दिल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (ता.१२) दुपारी १.३० च्या सुमारास कित्तूर चन्नम्मा चौकामध्ये घडली.
या चौकामध्ये सिग्नल चालू असल्याने कार व टू व्हीलर थांबल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ऊस वाहून ट्रॅक्टरने या सिग्नल वरील वाहनांना धडक दिली. यामध्ये एक कार, दोन दुचाकी पॅसेंजर रिक्षा अशा चार वाहनांचे नुकसान झाले . विशेष म्हणजे त्या वाहनांपैकी असलेली कार अगदी नवीन कोरी होती. नव्या कारचे नुकसान झाल्यामुळे चालकाने ट्रॅक्टर वाल्याला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी जमली होती. घटनास्थळी रहदारी पोलीस दाखल झाल्यानंतर समस्या निवारण करून सर्व वाहने पोलीस स्थानकाकडे नेण्यात आली. शहरात वाढलेली वाहनांची मोठी गर्दी अनेक अपघातांना निमंत्रण देत आहे. याचे प्रत्यंतर यामधून आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या