Type Here to Get Search Results !

बेकिनकेरे गावा शेजारील तलावात आढळला संशयास्पद महिलेचा मृतदेह

 बेकिनकेरे गावा शेजारील तलावात आढळला संशयास्पद महिलेचा मृतदेह


बेळगाव, ता. १२ : बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिराच्या शेजारी असलेल्या तलावामध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगताना सोमवारी (ता.१२) नागरिकांना आढळून आला. सुनिता रवळू भडांगे ( वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून याबाबत गावातील लोकांनी काकती पोलिसांना माहिती दिली. तलावात मृतदेह दिसल्याची माहिती पसरल्याने  गावातील लोकांनी तलावा जवळ गर्दी केली होती.



याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी गावातील लोक नेहमी प्रमाणे जनावरांना तलावात पाण्यासाठी घेवून गेले होते. यावेळी गावातील लोकांना तलावात मिलेचा मृतदेह पाण्यावर  तरंगताना आढलून आला. त्यामुळे गावातील लोकांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच काकती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. उमेश, उपनिरीक्षक श्री. मंजुनाथ यांनी  घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गावातील लोकांनी आणि पोलिसांनी तलावात तरंगणारा मृत्यू देह बाहेर काढला. यावेळी गावातील महिला सुनीता रवळू भडांगे ( वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी संशयास्पद मृत्यू झाल्याची नोंद केली असून याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 
-------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या