Type Here to Get Search Results !

रस्त्याकडेने चालणाऱ्या महिलाच्यावर ट्रॉली कलंडला ; चार महिला ठार

 रस्त्याकडेने चालणाऱ्या महिलाच्यावर ट्रॉली कलंडला ; चार महिला ठार

 बेळगाव, ता. ५ : रस्त्याकडेने गावातून कामावर जाणाऱ्या चार पादचारी महिलांचवर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला,  तर एका महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. एकूण चार महिलांचा मृत्यू झाल्याची बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ (ता. कागवाड) नजीक ही दुर्दैवी घटना घडली.

चंपा लक्काप्पा तलकट्टी (वय ४५), भारती वडदले (वय ३०), मालू रावसाब ऐनापुरे (वय ५५) तिघीही (रा. शेडबाळ)अशी घटनास्थळी मृत महिलांची नावे आहेत.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेकव्वा नरसप्पा सरसाई या महिलेला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच कागवाडचे आमदार राजू कागे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त महिलांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर कागवाड पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला.मृतदेहवर शासकीय रुग्णालयात  शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या अपघातामुळे मिरज जमखंडी महामार्ग काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या