येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ संपन्न
येळळूर, ता. ३ : आगामी ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १९ व्या येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मूहूर्तमेढ रोपण बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक आर एम चौगुले व त्यांच्या पत्नी प्रीती चौगुले यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात शनिवारी ( ता. ३) रोवण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळळी हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक अभिजीत सायमोते हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिजीत सायमोते म्हणाले,विचारवंत समाज निर्माण करण्यासाठी अशा ग्रामीण साहित्य संमेलनाची आज गरज निर्माण झाली आहे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वाचन चळवळ वाढीला लागते. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून वाचन संस्कृती वाढविली पाहिजे. उद्योजक आर एम चौगुले म्हणाले, मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्याचे खरे काम येळळूर गाव साहित्य संमेलनाच्या निमित्ताने करीत आहे. ही खरोखरच सीमा वासियांना अभिमानास्पद बाब आहे.
यावेळी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदिहळळी, येळळूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळळी यांनीही यावेळी विचार मांडले. यावेळी येळळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम बी बाचीकर, चांगळेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण धामणेकर, येळळूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक मोहन पाटील, डॉ. तानाजी पावले, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, परशराम बिजगरकर प्रा. सी.एम. गोरल, ,संजय मजूकर, पुंडलिक मेणसे, अमोल जाधव, डॉ. सरिता गुरव, प्रशांत सुतार, बाळाराम पाखरे, एच एस लोकळूचे एस पी मेलगे, रेखा पाटील, विद्या पाटील,भरमाजी कंग्राळकर, एम.बी पंथर आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सी.एम. गोरल यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक एम बी बाचीकर यांनी मानले.
------------


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या