विक्री कर विभागाचे निवृत्त आयुक्त हुसेन तरडे यांचे निधन
बेळगाव, ता. १ : सेवा निवृत्त सेल्स टॅक्स कमिश्नर हुसेन तरडे यांचे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू होते. बेळगाव सह राज्यातील इतर जिल्ह्यात त्यांनी विक्री कर आयुक्त म्हणून सेवा बजावली होती. आज दुपारी ३.३० वाजता अंजुमन मुस्लिम स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या