धोकादायक वळणावर पुन्हा अपघात
एक महिला ठार , एक जखमी
बेळगाव, ता. ३ : सांबरा (तालुका बेळगाव) गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार गाडी 70 ते 80 फूट उलटीपलटी होत रस्त्याशेजारी शेतात जाऊन पडली. परिणामी या घडलेल्या अपघातात 1 महिला ठार तर अन्य एक जण जखमी झाला. शुक्रवारी (ता.२) मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार (TN 75 Z 1686) शुक्रवारी मध्यरात्री भरधाव वेगाने बेळगावहून सांबऱ्याकडे निघाली होती.सांबरा गावाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्यावरून सुमारे 70-80 फूट उलटी पलटी होऊन शेजारील शेतात जाऊन पडली.
परिणामी गाडीतून प्रवास करणारी एक महिला ठार झाली आहे. तर अन्य एक जण जखमी झाला आहे. भर वेगाने उलटी पलटी होऊन पडल्यामुळे कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघाताची मारीहाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
-----------------


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या