हलग्याजवळ सर्विस रोडवर वाहतुकीची कोंडी
बेळगाव, ता. ३ : हलगा (ता. जि. बेळगाव) येथील सर्व्हिस रोडवर अडकला ट्रक अडकला. परिणामी वाहतूक शुक्रवारी (ता.३) तासभर ठप्प झाली होती. तासभरानंतर अडकलेला ट्रक काढण्यात आला.
सिमेंट वाहतूक करणारा एक मोठा 16 चाकी ट्रक आडवा अडकून पडल्यामुळे जवळपास तासभर वाहतुकीची कोंडी झाल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली. सदर रस्त्यावर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने घडत असून याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
हलगा येथील अल्ट्राटेक गोडाऊनला सिमेंट आणणारा 16 टायरचा मोठा ट्रक काल शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास हलगा सर्व्हिस रोडवर आडवा अडकून पडला. जवळपास एक तास अथक प्रयत्न केल्यानंतर चालक व क्लिनरला ट्रक व्यवस्थित रस्त्यावर आणून मार्गस्थ होत आले. मात्र दरम्यान अडकलेल्या ट्रकमुळे सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी होऊन मोठी समस्या निर्माण झाल्याची होती. हलगा सर्व्हिस रोडवर बरीच गोडाऊनं असल्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवत असते. अवजड वाहन चालकांच्या मनमानीमुळे वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय छोटे मोठे अपघातही घडत असतात. त्यामुळे या ठिकाणच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे आहे. तरी हलगा सर्व्हिस रोडवर एखाद्याचा अपघाती मृत्यू होण्याची वाट न पाहता हलगा ग्रामपंचायत गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित आवश्यक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या