सुळगा मसनाई मंदिराची वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कळसारोहन रविवारी
बेळगाव, ता. ५ : सुळगा (हिं) येथील श्री मसणाई देवी मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहन सोहळा शनिवारी (ता.१०) आणि रविवारी (ता. ११) आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
मंदिराच्या कलश मिरवणूक शनिवारी (१०) सायंकाळी 4:00 वा संपुर्ण सुळगा गावात काढली जाणार आहे.त्याच बरोबर मंदिराची वास्तुशांती ,कळसारोहन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिर उद्घाटन सोहळा रविवार (ता.११) या कार्यक्रमात कळसारोहन करण्यासाठी परमपूज्य श्री हरी गुरू महाराज रुद्रकेसरी मठ बेळगांव, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सर्व विधी पुरोहितांच्या मंत्रघोषात, देवस्की पंचकमिटी, संपूर्ण युवावर्ग आणि सुळगा ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहेत आणि त्यानंतर महाप्रसादाने ह्या सर्व कार्यक्रमांची सांगता होणार आहे.
----------------------
देवस्की पंच कमिटी सुळगा आणि समस्त युवावर्ग सुळगा (हिं) बेळगांव*
🚩🚩🚩🚩🚩🚩
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या