पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बेळगाव, ता. ६ : शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या माजी नगरसेविका व बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका सरला हेरेकर, प्राध्यापक अशोक अलगोंडी व एलआयसी चे डेव्हलपमेंट ऑफिसर अतुल देशमुख व अध्यक्ष स्थानी परशराम गोरल उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत पर नृत्य मलप्रभा पाटील हिच्या द्वारे व विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन गायनाने सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी सर यांनी केले. तसेच पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाहुण्यांची ओळख कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांनी केले. यानंतर वार्षिक अहवाल प्रा. स्मिता मुतगेकर यांनी मांडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या श्रीमती सरला हेरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजाला वाहून घेतले पाहिजे. तसेच संस्कृती जपली पाहिजेत. अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यानंतर अतुल देशमुख यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजेत असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक अशोक अलगोंडी यांनी आई हा जीवनाचा मुख्य घटक आहे. आणि त्याचबरोबर शिक्षण हा सुद्धा त्याला जोडणारा दुवा आहे. शिक्षण आणि आई-वडील यांना आपण जर आनंदाचे क्षण देऊ शकतो ते म्हणजे शिक्षणानेच. म्हणून विद्यार्थ्यांच्या अंगी नेहमी कष्ट करण्याची जिद्द आणि अभ्यास करण्याचे सातत्य असले पाहिजेत. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपण अभ्यास करून आपलं यश संपादन करावे असे मार्गदर्शन केले. व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा ही दिल्या.
यानंतर लक्ष्मण बांडगे यांचा कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांनी हे सत्कार निमित्त आपले मनोगत व्यक्त केले. व विद्यार्थ्यांना शुभेच्छा ही दिल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये व यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषके देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर आदर्श विद्यार्थीनी म्हणून वाणिज्य विभागामधून आरती गोरल व कला विभागामधून वैष्णवी सांबरेकर यांचा गौरव करण्यात आला. व आदर्श खेळाडू म्हणून विनायक पाटील व रतन पाटील यांचा गौरव करण्यात आला. तसेच श्रीमती सरला हेरेकर यांनीही विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. शेवटी परशराम गोरल यांनी अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व नाटक असे वेगवेगळ्या कृतीतून मनोरंजन केले. कार्यक्रमाला विश्व भारत सेवा समिती या संस्थेचे संचालिका श्रीमती विमल कंग्राळकर, संचालक एस एम साखळकर, संस्कृतीक विभागाचे प्रमुख सुरज हत्तलगे, विद्यार्थी प्रतिनिधी रामलिंग मोरे, विद्यार्थिनी प्रतिनिधी रतन पाटील, सांस्कृतिक सेक्रेटरी चेतन गावडे, धनश्री गाडे, विजया डिचोलकर, लग्मेश खोत, ऋतुराज ब्यातगार, गौतम कोकणे,कुसुम अष्टेकर, राजू हळब, मयूर नागेनहट्टी तसेच संस्थेचे संचालक, पालकवर्ग, विद्यार्थी, शिक्षकवृंद व कर्मचारी असे बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका चलवेटकर व आभार प्रदर्शन के. एल. शिंदे यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या