आम्हा शेतकऱ्यांना विषाचा बाटली द्या ; त्यानंतर सर्वेक्षण करा
बेळगुंदी, ता. २ : रिंगरोडसाठी भूसंपादन करण्यापूर्वी आम्हा शेतकर्यांना विषाची बाटली द्या, त्यानंतरच रिंगरोडसाठी सर्व्हे करा, अशी आक्रमक भूमिका बेळगुंदीतील शेतकर्यांनी रिंगरोड सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकार्यांन समोर माडली. आमची जमीन देणार नाही. आम्ही या रस्त्याच्या विरोधात न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे. तेंव्हा सर्वेक्षणाला आमचा विरोध आहे. अशी शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अधिकार्यांना माघारी फिरावे लागले.
बेळगुंदी येथे प्रस्तावित रिंगरोडसाठी सर्वेक्षण करण्यासाठी शुक्रवारी (ता.२) दुपारी महामार्ग प्राधिकारणाचे काही अधिकारी आले होते. त्यांना शेतकर्यांनी कडाडून विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण करण्यास देण्यात येणार नाही. अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली. यामुळे अधिकार्यांना माघारी फिरावे लागले.
गावात रिंगरोड सर्व्हेसाठी अधिकारी आल्याची माहिती शेतकर्यांना मिळताच वेशीतील नाल्याजवळ एकत्र जमा झाले. सर्व्हेसाठी आलेल्या अधिकार्यांना शेतकर्यांनी जाब विचारला. रिंगरोडला शेतकर्यांचा विरोध आहे. यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे. काही शेतकर्यांना न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. परिणामी रिंगरोडसाठी सर्व्हे करु नये, अशी माहिती दिली.
शेती हाच शेतकर्यांना आधार आहे. रिंगरोडसाठी जमीन संपादित करण्यापूर्वी सरकारने शेतकर्यांना पहिल्यांदा विषाची बाटली द्यावी. त्यानंतरच भूसंपादनाच्या हालचाली कराव्यात, असे सुनावले. अधिकार्यांनी स्थगिती आदेशाची मागणी केली. त्यानुसार शेतकर्यांनी वकिलांबरोबर संपर्क करुन माहिती दिली. स्थगिती आदेश देण्याची तयारी केली. यामुळे हतबल बनलेल्या अधिकार्यांनी माघार घेत तेथून काढता पाय घेतला.
यावेळी शंकर चौगुले, महेश पाऊसकर, नामदेव गुरव, प्रसाद बोकडे, उमेश पाऊसकर, सोमनाथ पाऊसकर, कृष्णा बाचीकर, लक्ष्मण कडोलकर, अशोक गावडा, भरमू गावडा, भरमू पाऊसकर, आलेस डिसोजा, परसराम शहापूरकर, विक्रम बाचिकर, जेरोन लोबो, अशोक शहापूरकर, दादू रायान्नाचे, म्हातारू गावडा आदींसह शेतकरी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या