आरोग्य तपासणीस २५०० नागरिकांडून नोंदणी ः सकाळी 9 वा. होणार तपासणीला सुरूवात
बेळगाव, ता. ७ : बेळगुंदी भागात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या मोफत महा आरोग्य तपासणी शिबिरात तपासणी करूण घेण्यासाठी सुमारे अडिच हजार लोकांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईन नोदणी प्रक्रिया आयोजिक करण्यात आली असून या प्रक्रियेला लोकांकडून चांगला प्रतिसात मिळाला असून उद्या शिबिरात जवपास 23 तज्ञांनकडून तपासणी केली जाणार असून सकाळी 9 वाजल्यापासून आरोग्य तपासणीला सुरूवात होणार आहे. तरी बेळगुंदी भागातील सर्व नागरिकांनी या शिबिरात सहभाग होऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे. आवाहन महांतेश कवटगीमठ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
महांतेश कवटगीमठ फाउंडेशनच्या व के एल ई सोसायटी डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र बेळगाव, के एल ई सेंटनरी चॅरीटेबल हॉस्पिटल, वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन मराठी शाळेच्या पटांगणावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी (ता.१०) सकाळी ९ ते दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदणी केलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
या शिबिरामध्ये हृदयरोग व शस्त्रक्रिया मेंदू रोग व शस्त्रक्रिया डायबेटोलॉजी जनरल सर्जरी चेस्ट अँड रेस्पिरेट्री मेडिसिन, नाक कान व घसा दंतरोग व शस्त्रक्रिया फिजिओथेरपी आयुर्वेद होमिओपॅथी हाडांचे विकार व सांधेरोपण यूरोलॉजी अँड नेफ्रॉलॉजी, लहान मुलांचे आजार व शस्त्रक्रिया, डोळ्यांचे विकार त्वचा विकार आदी आजारांसह सर्व विकारांची तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात एकूण २३ विभागातून या शिबिरात सहभाग होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अधिक गरजेचे आहे यासाठी खाली दिलेलेल्या क्यू आर कोड स्कॅन करून प्रत्येकाने आपली नोंदणी करावी नोंदणी असलेल्या व्यक्तींनाच तपासणी शिबिरात सहभागी होता येणार आहे त्यामुळे प्रत्येकाने ऑनलाइन नोंदणी करावी असे आयोजकाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या