मराठा समाजातील युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे : पी डी पाटील
बेळगाव, ता. १८ : सोहळ्यावर होणारे अनावश्यक खर्च टाळून शिक्षणाला प्राधान्य द्यावे. जो समाज ज्ञानांमध्ये पुढे आहे. तो समाज अधिक मजबूत आणि बलवान आहे. मराठा समाजातील युवकांनी व्यवसायाकडे वळावे. समाजातला युवक विकसित झाला की समाज विकसित होतो. तेंव्हा मराठा समाजातील युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे. असे प्रतिपादन गडहिंग्लज येथील प्राध्यापक पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले.
बेळगुंदी येथील बालवीर सभागृहात झालेल्या मराठा सेवा संघ बेळगांव आयोजित युवा, युवती, महिला उद्योजक मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मराठा सेवा संघ बेळगांवचे सचिव मनोहर घाडी यांनी स्वागत केले. तर जिजाऊ पुजन माजी तालुका पंचायत सदस्या कमल मन्नोळकर यांनी तर शिवपुजन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिवश्री प्रा.पी.डी.पाटील यांनी केले. यावेळी समाजातील ज्या व्यक्तींचे निधन झाले त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. जिजाऊ वंदना मच्छे गावच्या मुलींनी सादर केली.
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी बेळगांव यांनी प्रास्ताविक केले व मराठा समाजातील शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, धर्मसत्ता, प्रचार-प्रसार माध्यमसत्ता यावर मराठा समाजाने आपली पकड कशी निर्माण करावी हे सांगितले.
यावेळी मराठा समाजातील नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नवउद्योजक कृष्णा सातेरी बस्तवाडकर, सागर येड्डी , डॉ. नितीन राजगोळकर, नारायण के नलवडे, सुमिता राम फडतरे , निरंजन कारगी, मारुती गोडसे , प्रविण पाटील यांचा मराठा सेवा संघ बेळगांव च्या वतीने सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या