Type Here to Get Search Results !

मणतुर्गा हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

 मणतुर्गा हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

खानापूर, ता. १८ : मणतुर्गा येथील चांगळेश्वरी शिक्षण संस्था येळ्ळूर संचलित मणतुर्गा हायस्कूल  मणतूर्गा यांच्या वार्षिक क्रीडामहोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला.



या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार हे होते, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकवण्यात आला तर क्रीडामशाल हेब्बाळकर कन्स्ट्रकशन चे किशोर हेब्बाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या हाती देऊन स्पर्धांना चालना देण्यात आली, यावेळी अमृत शेलार व सुरेश सुळकर यांचा समयोचित सत्कार करण्यात आला, माध्यमिक शिक्षक संघाचे कर्नाटक राज्य सेक्रेटरी सलीम कित्तुर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भाषण केले.

धनंजय पाटील यांनी बौद्धिक क्षमते बरोबर शारीरिक हित ही तितकेच महत्वाचे असल्याचे सांगितले. प्रास्ताविक मुख्याध्यापक जे. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन शिक्षिका संगीता व्ही. ए. पाटील यांनी केले. यावेळी नितीन पाटील,सुधीर पाटील,मऱ्याप्पा पाटील,तुकाराम पाटील, रमेश चव्हाण, सुभाष पाटील, क्रीडा शिक्षक के.आर. पाटील,टी. आर.भंडारी,पी.वाय. कोळी,डी. एम.पाटील, ए. एस. पाटील, जे. डी. पाटील, पी. एस. गावकर आदी उपस्थित होते. आभ एस.एल.सुतार यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या