Type Here to Get Search Results !

अंतिम मतदार यादी मराठीतही उपलब्ध : जिल्हाधिकारी नितेश पाटील

अंतिम मतदार यादी मराठीतही उपलब्ध  : जिल्हाधिकारी नितेश पाटील


बेळगाव, ता. ३१ : जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली अंतिम मतदार याद्या मराठीतही उपलब्ध असून 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात  आल्या आहेत. मतदारांना ऑनलाइन  आपली नावे तपासणी करता येतात. अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.


 प्रशासनाने जाहीर केलेली अंतिम मतदार यादी मराठीत नाही. अशी चुकीची माहिती काही जनाना मिळाली होती. परिणामी याबाबत मुख्य निवडणूक आयोगाकडे मराठी मतदार यादी देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली. याबाबतची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. त्याचबरोबर मराठीत मतदार यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे, असे सांगितले. त्याचबरोबर ती यादी ऑनलाईन ही उपलब्ध आहे. अशी माहिती श्री. कलघटगी यांना देण्यात आली.



जिल्हा प्रशासनाकडून लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून त्या प्रसिद्धी करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ उडणार नाही. यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांची संख्या असल्यामुळे या ठिकाणी मराठीतून मतदार याद्या उपलब्ध करण्यात आले आहेत नावांची तपासणी करावयाची असल्यास ऑनलाईन जाऊन तपासणी करून घ्यावी. असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या